जनसेवा गृहकर्ज

17 Apr 2023 11:20:55
 
Janaseva Home Loan
 
 
घर म्हणजे जिथे प्रत्येक नात्यातला मायेचा वाहणारा अखंड झरा असतो
घर म्हणजे जिथे मनाबरोबरच घराचाही प्रत्येक कोपरा हळवा असतो......
 
घर म्हणजे प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी वास्तू असते. दिवसभर कुठेही कामानिमित्त गेलो तरी संध्याकाळी पावलं आपसूकच घराकडे वळतात. कारण तिथे आपली माणसं वाट बघत असतात. आपले एकतरी घर असावे यासाठी प्रत्येकजण स्वप्न बघत असतो आणि ते सत्यात उतरवण्यासाठी धडपडत असतो. आपल्या कुटुंबाला सुरक्षित छप्पर देण्यासाठी शोध सुरू होतो घराचा. शहरात राहताना नोकरी सांभाळत दर “ वीकएंड “ आपल्या सहचारिणीसोबत आपण जात असतो ते घराच्या शोधात. एका स्कीमकडून दुसऱ्या स्कीमकडे आणि मनासारखे घर पसंत पडले की विचार सुरू होतो डाउनपेमेंटचा , गृहकर्जाचा आणि त्याच्या ई एम आय चा. चला तर आता पाहूयात गृहकर्जाबद्दल.
 
गृहकर्ज हा कर्जाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. अनेक हाऊसिंग फायनान्स कंपन्या, सार्वजनिक बँका आणि खाजगी बँका गृहकर्ज देतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीचे घर खरेदी करण्यासाठी पैसे उधार घेता येतात आणि मासिक हप्त्यांमध्ये कर्जाची परतफेड करता येते.
 

गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी खालील गोष्टींचा विचार आवश्यक आहे.

1. गृहकर्ज पर्यायांची तुलना करा : व्याजदर, कर्जाची रक्कम, कालावधी आणि इतर शुल्क या घटकांची तुलना केल्याने गृहकर्जाचा पर्याय मिळतो.
 
2. क्रेडिट स्कोअर : क्रेडिट स्कोअर हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे ज्याचा बँका तुम्हाला गृहकर्ज देण्यापूर्वी विचार करतात. 750 किंवा त्याहून अधिक चांगला क्रेडिट स्कोअर राखला पाहिजे.
 
3. कार्यकाळ : जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही त्याचा लाभ घेण्यापूर्वी कालावधी निश्चित केला पाहिजे.
 
4. पात्रता निकष: ज्या गृहकर्जासाठी पात्र असाल ती रक्कम तुमचे वय, कामाचे स्वरूप, क्रेडिट स्कोअर, उत्पन्न, कार्यकाळ इ. यावर अवलंबून असते.
 
5. प्रक्रिया शुल्क : प्रत्येक गृहकर्ज घेणार्‍याने गृहकर्ज अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी कर्जदाराला भरावे लागणारे शुल्क आहे. प्रक्रिया शुल्क संस्थेनुसार बदलू शकते.
 
6. डाउन पेमेंट : जेव्हा तुम्ही गृहकर्जासाठी अर्ज करता, तेव्हा तुम्हाला एकूण गृहकर्जाच्या रकमेच्या 10 % ते 15 % डाउन पेमेंट भरण्यास सांगितले जाते.
 
7. दस्तऐवज : गृहकर्जामध्ये तारण असते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदपत्रे देखील असतात. गृहकर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी बँकेच्या अटी व शर्ती वाचल्या पाहिजेत.
 

गृहकर्ज - लवकर परतफेड की गुंतवणूक?

गृहकर्जाची लवकर परतफेड करावी की जास्तीची रक्कम गुंतवणूकीसाठी वापरावी? या प्रश्नाला सर्वांना एकसारखे लागू होईल असे उत्तर नाही.
 

गृहकर्जाचे फायदे :

१. कमी व्याजदर - आपल्याला उपलब्ध होणारे सर्वात स्वस्त कर्ज म्हणून गृहकर्ज चांगले कर्ज म्हणून ओळखले जाते. गृहकर्ज ६.५% - ८% या व्याज दराने उपलब्ध आहे. त्या तुलनेत इतर कर्जांचा व्याजदर जास्त असतो.
 
२. सरकारी योजनांचा फायदा - गृह कर्जाची रक्कम लहान असेल तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यावर अनुदान व इतर काही योजनांमध्ये व्याजदर सूट मिळू शकते.
 
३. आयकर सवलती - आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी गृहकर्जाला प्राप्तिकरामधून पुढील सवलती मिळतात.
 

अ. गृहकर्जावरील व्याज :

  • मालमत्ता जर कर्जाद्वारे बांधली असेल किंवा खरेदी केली असेल तर त्या कर्जावरील व्याजाची वजावट घरभाडे उत्पन्नातून घेता येते.
  • जर करदात्याकडे दोन घरे असतील आणि ती भाड्याने दिलेली नसतील, तर त्यांचे घरभाडे उत्पन्न शून्य समजले जाते आणि त्या उत्पन्नातून गृहकर्जावर भरलेल्या व्याजाची वजावट मिळते.
  • घरखरेदी किंवा गृहकर्ज घेतलेल्या वर्षांपासून तीन वर्षांत बांधले असेल तर व्याजाची २ लाख रुपयांपर्यंत वजावट मिळते.

व्याज सवलत :

- तुम्ही घर भाड्याने न देता स्वतः वापरत असाल आणि तुमच्या गृह कर्जाचे व्याज एका आर्थिक वर्षात रु. २ लाखांपेक्षा जास्त असले तरी तुम्हाला गृहकर्जाच्या व्याजाची फक्त २ लाख रुपयांपर्यंतच वजावट मिळते.
 
- गृहकर्ज परतफेड हप्त्यांत सुरुवातीच्या वर्षांत व्याजाची रक्कम मोठ्या प्रमाणात असते आणि थोडाच भाग मुद्दल परतफेडीचा असतो. यामुळे मोठ्या रकमेच्या गृहकर्जाच्या बाबतीत गृहकर्ज व्याजाची परतफेड सुरुवातीच्या वर्षांत रु. २ लाखांपेक्षा जास्त असते.

गृहकर्जाची लवकर परतफेड करणे आपल्याला फायद्याचे ठरते आहे का हे तपासणे –

 

१. महागाई आणि गृहकर्जाची परतफेड :

गृहकर्ज हे १५-२०-२५ वर्षांसाठी घेतलेले असते. त्याचा मासिक हप्ता उर्फ ईएमआय हा कर्ज घेतानाच ठरलेला असतो. मात्र कालांतराने गृह कर्ज हप्त्याच्या रकमेचे मूल्य कमीकमी होऊ लागते.
 

२. प्राप्तिकर सवलतींच्या दृष्टिकोनातून :

  • 'गृहकर्जाची लवकर परतफेड करणे म्हणजे भविष्यातील आयकर परतावा वजावटीवर पाणी सोडणे!' असा बऱ्याच लोकांचा समज असतो आणि त्यामुळे ते गृहकर्जाचे ओझे वर्षानुवर्षे डोक्यावर ठेवून जगत असतात. बऱ्याचवेळा गृहकर्जामुळे होणारी प्राप्तिकर बचत आपण व्यवस्थित समजून घेत नाही. गृहकर्जामुळे मर्यादित रकमेचीच आयकर बचत होते.
  • गृहकर्जाची परतफेड करता येईल अशी रक्कम तुम्ही बँक मुदत ठेवींत ठेवली तर फायदेशीर ठरणार नाही. कारण त्यातून मिळणारा करोत्तर परतावा हा गृहकर्जावरील व्याजदरापेक्षा कमीच असेल.
  • जर तुम्हाला गृहकर्जाचा मासिक हप्ता भरत राहणे सहज शक्य आहे तर लवकर परतफेड करण्याची घाई करायची आवश्यकता नाही. सुयोग्य गुंतवणुकीतून आपल्याला त्याच पैशातून जास्तीचा परतावा निर्माण करून देऊ शकतात.
  • कर्जहप्ता भरण्यात तुमची खूप ओढाताण होत असेल तर जास्तीत जास्त रक्कम मुद्दलात भरून कर्ज हप्ता कमी करायचा प्रयत्न करा.
  • गृहकर्जामुळे भरत असलेल्या व्याजापेक्षा घराच्या किंमतीत होणारी वाढ आणि तुमची कर्जाबाबतची मानसिक अवस्था यांचा विचार करून लवकरात लवकर कर्जमुक्त होण्यासाठी प्रयत्न केल्यास फायदेशीर ठरेल !
 
जनसेवा बँकेकडून आपणांस पूर्ण आणि सर्व प्रकरचे सहकार्य मिळेल याची आम्ही खात्री देतो. आजच आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा : 
 
 
Apply
Powered By Sangraha 9.0