तुमचाच सुवर्ण ठेवा तुमच्यासाठी..

03 Sep 2023 16:52:43

Janaseva-Bank-Gold-Loan 
 
आज दृष्टीला डॉक्टराकडे पुढच्या भेटीसाठी घेऊन जायचे होते. यापुर्वीच्या तपासणीदरम्यान डॉक्टरांनी वर्तवलेले अंदाज रिपोर्टमधून खरे ठरले तर... अशी भीती सीमाताईंना अस्वस्थ करीत होती. रमेशरावांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. दुर्ष्टी ही रमेशराव आणि सीमाताईंची धाकटी मुलगी होती. पण परवा कॉलेजमध्ये पायऱ्यांवरून पडून तिच्या तोंडाला मार लागला होता. तिला जेवण करता येत नव्हते. आणि दृष्टीच्या चेहऱ्याच्या गालाच्या आतील बाजूस असलेल्या हाडाची छोटीशी प्लास्टिक सर्जरी करावी लागणार होती. या ऑपरेशनसाठी लागणारा वेळ, खर्च तसेच इतर बाबी याबद्दल चौकशी केली असता असे कळले की प्लास्टिक सर्जरी या कॅटेगरीमुळे ते कोणत्याही प्रकारच्या विम्यामध्ये कव्हर होत नाही. हे ऐकल्यावर तर दृष्टीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली.
 
पण रमेशरावांचा स्वभाव स्थितप्रज्ञ असल्याने आणि भविष्याचा वेध घेण्याची सवय असल्याने त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सीमाताईंना शांत केले. पैशाची थोडीशी तजवीज बचतीमुळे होतीच परंतु तरीही सर्जरीसाठी पैसे कमी पडत होते. मग मात्र या दांपत्याने स्त्रीधनाची मदत घेतली आणि जनसेवा बँक सोनेतारण कर्ज योजनेचा लाभ घेतला. बँकेत त्वरीत कर्ज मंजुर झाले. दृष्टीची शस्त्रक्रिया सुरळीत पार पडली आणि ती अगदी ठणठणीत बरी झाली. असे हे आपल्या घरातील-आपल्या संसारातील सोने. संकटसमयी आपल्याच कामी येणारे. याचा सर्वांनी नक्कीच विचार करायला हवा.
 
5500 वर्षांपूर्वी पहिल्यांदा सोने सापडले होते. वेळेनुसार लोकांना सोन्याचे महत्व कळत गेले. त्यांना हळूहळू कळले की हा एक मौल्यवान धातू आहे ज्याला गंज लागत नाही. तसेच याला कोणताही आकार दिला जाऊ शकतो. हे खुपच चमकदार असून याची चमक नेहमी अबाधित राहते. म्हणूनच हजारो वर्षांपासून, भारतीय कुटुंबांमध्ये एक विशेष आणि अलंकारीक मालमत्ता म्हणून सोन्याला एक विशेष स्थान आहे. सोने हे बहुधा प्रत्येक भारतीय घरातील अविभाज्य भाग आहे. मुल जन्मल्यापासून ते आयुष्यभर सोन्यामध्ये कौटुंबिक किंवा व्यक्तिगत अशी गुंतवणूक करुन ठेवली जाते. मुलीचा जन्म, बारसे, लग्न, सण-समारंभ किंवा वाढदिवस अथवा कुठलीही शुभ वेळ असो सोन्याचे नाते हे आप्तस्वकीयांबरोबर परस्परांच्या भावनांशी जोडलेले असते.
 
लग्न समारंभात कुटुंबाची प्रतिष्ठा, हौस आणि आनंदाचे प्रतिक म्हणून जबाबदारी बजावण्याचे काम हा धातू अगदी चकाकत करीत असतो. भावाकडून बहिणीला, अभिनंदनाचा वर्षाव करताना, कौटुंबिक मेळाव्यात, मुलीला वडीलांकडून मायेची भेट म्हणून, खास प्रसंगी नवऱ्याकडून बायकोला, कधी प्रेम म्हणून तर कधी रुसवा काढण्यासाठी म्हणून या सोन्याचा वापर आणि मदत घेतली जाते.
 
कुटुंबांमध्ये एक विशेष आणि अलंकारीक जतन करुन ठेवण्याची वस्तू ही भावना आजही खरेदीदारांच्या मनामध्ये कायम आहे. भारतात सोने खरेदी करणाऱ्यांपैकी बहुतांश लोक याकडे पुन्हा विक्री न करता येणारी भौतिक संपदा म्हणून पहातात. सोने ही गुंतवणूक तर आहेच परंपरेचा एक भाग आहे हे मात्र आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.
 
सोन्यामध्ये गुंतवणूक करून दीर्घ कालावधीत खूप जास्त परतावा मिळण्याची अपेक्षा नाही परंतु गरजेच्यावेळी उपयोगी मात्र ते नक्की पडते. विशिष्ट कालावधीत , उत्कृष्ट परतावादेखील यातून मिळू शकतो.
सोन्याची गुंतवणूक गुंतवणूकदारांना आणीबाणीच्या वेळी किंवा त्यांना रोख रकमेची गरज असताना त्याचा व्यापार करण्याची संधी देते. गोल्ड ईटीएफ सर्व पर्यायांपैकी सर्वात जास्त रास्त पर्याय असू शकते. आपल्याला स्वत:चे दागिने असावेत, अशी गरज दिवसेंदिवस वाढत असल्याने सोन्यात गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढत आहे.
 
सोनेतारण कर्ज योजनेसारख्या योजना बँकेतून चांगला परतावा देऊन अचानक उद्भवलेल्या संकटात मदतीला उभ्या राहू शकतात. आपलीच मालमत्ता किंवा गृहलक्ष्मी घरातूनच आशीर्वाद देत आपल्या हाकेला प्रतिसाद देत आहे. बँकेच्या या सुविधेचा लाभ सर्वांनी नक्कीच घ्यायला हवा आणि वेळेला उपयोगी येणाऱ्या सोन्याचा उपयोग करून आयुष्याचे सोने करा.
 
Powered By Sangraha 9.0